Woman facing back

Poem- वळण

रस्ते हरवलेत सगळे,
मार्गावर तरी कुठल्या जाऊ?
पाऊलं अडखळत आहेत आज,
विश्वास ही डगमगलाय.
चुकलय एक वळण,
वाटतंय, वळणं पुन्हा येऊच न्हयेत.
परत काही त्या मार्गाला,
पाऊलं वळू न्हायेत.
गाठायचा आहे पैलतीर…
पण दिशा झाल्यात बेधुंद.
दिसतोय फक्त एक टोकाला
आशेचा पट्टा अरुंद.
थांबले आहे एका टप्प्यावर विचार करून,
काही सुटले तर नाही ना मार्गावर?
कळलेच नाही मला काही;
मी पुढे निघून आले, की शेष राहिले काही वळणावर…

Photo by Maria Tyutina 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories