Book and pens

ओबडधोबड कविता for when in Love

The poet shares that he, who never liked poetry, is using this very form to express his feelings towards the one he has fallen in love with.

न भेटता न ओळखता पण, अनेक दुरावे जाणवतात,
न भेटता न ओळखता पण, अनेक माणसं आपलीशी होतात.
प्रेम आणि प्रेम-प्रकरण तर ट्रेंडिंग आहे आज,
तरी सुद्धा ती माझ्या मनात archive आहे आज.

स्वार्थी मी, आयुष्यात पहिली कविता किंवा मराठी ओळ लिहतोय खरं,
ती सुद्धा तुझ्या साठी…
आणि आज सुदधा तू माझीच आहेस पण फक्त माझ्याच साठी.

कविता शब्दावर हसणारा आणि ignore करणारा मी,
आज मराठीत लिहितोय,
आयुष्यात अनेक वेळा पडून सुद्धा झेबर्याच्या मुला पाही,
परत एकदा उभ राहू पाहतोय

स्वतः च्या पायावर उभं राहणं किती गरजेचं आहे हे प्रेमाच्या लाथेनेच कळत हे खरं,
पण तेच प्रेम पुढे सोडून जात हे सुद्धा तितकंच खरं!

कापलेल्या खोडावरची पालवी न होता त्या खोडाचा आधार घेऊन, त्या खोडाच महत्व वाढवणारा वेल, तू होशील का?
त्याच खोडाला पोषणारी माती तू होशील का?
अंतरातल्या ओल्या मायेच्या काजव्याला प्रकाश देणारी होशील का?
कविता इग्नोर करणाऱ्या, पण अचानक अशीच ओबडधोबड कविता लिहीणार्या मुलाची राधा,
तू होशील का ?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories