कविता – कसे?

मैफिलीत आज रंग चढणार कसे?
प्रेम व्यथेत आज भिजणार कसे?

गझला माझ्या, रसिकांसाठी गातो मी,
मुडदयांना शेर माझे कळणार कसे?

गझलेसाठी काळीज सालाव लागतं,
त्याशिवाय शेरांना अर्थ मिळणार कसे?

शिवबाचे मावळे आम्ही, सांगून ठेवतो!
मोडाल आम्हाला पण झुकवणार कसे?

किती खाशील तू दलालीच्या थाळ्या,
ताटात शोभेल ते पण पचणार कसे?

एकच प्रश्न सतावतो त्या बळीराजला,
पिलाच्या चोचीतले दाणे पेरणार कसे?

वासनेचा जंतू वळवळला तुझ्यात आज,
शरीर मिळवशील तू, प्रेम मिळणार कसे?

आयुष्याच्या व्यथेचेही व्यंग करतो मी,
हसतोच आता मी, रडणार कसे?

सखे, ही भेट आपुली कमाल होती!
एकच सांग, पुढच्या वेळी भेटणार कसे?

Photo by Engin Akyurt

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories